Skip to main content
माझ जरा वेगळ आहे.......प्रेम
आजवर प्रेमाच्या खुप कथा ऐकल्या असतील आणि पाहिल्याही sअसतील, काही real तर काही काल्पनिक सर्वच आणि प्रेमावरच्या कविता तर काही सांगायलाच नको...! पण मी काही प्रेमावर कविता वैगेरे करणार नाही पण हा एक Love Story नक्कीच सांगणार आहे. सगळे म्हणतात आजकाल खर प्रेम बघायलापण मिळत नाही मला तस नाही वाटत..आपल्या मनात प्रेम असेल ना तर आपल्याला सगळीकडे प्रेम दिसत आणि trust me ते तेवढच pure असत. कारण प्रेम की ठरवुन करता येत नाही..ते म्हणतात ना, 'बेवजह है तभी तो मोहोब्बत है वजह होती तो साजिश कहलाती' त्याचप्रमाणे मी पण 'प्रेम' केल पण मी म्हणेल मी केल्यापेक्षा ते झाल. आता ते कधी झाल कसं झाल ते मला माहित नाही आणि ते विशिष्ठ पणे मला मांडताही येणार नाही कारण ते प्रेम होत आणि ते झाल....! पण माझ्या प्रेमाची story जरा वेगळी आहे कारण मला ज्याच्याशी प्रेम झालय ना ती व्यक्ती अशी आहे ना कि कोणीही त्याला क्षणभर जरी पाहिल ना तरी त्याच्या प्रेमात पडेल...पण माझ थोड वेगळ होत...😊 कारण मी जेव्हा प्रेमात पडले तेव्हा त्याला सांगायच नव्हत पण जेव्हा सांगितल तेव्हा अडकायच आणि अडकवायच नव्हत पण जेव्हा अडकलो तेव्हा बांधुन ठेवायच नव्हत पण बांधलो गेलो तेव्हा मला सुटायच नव्हत.....! म्हटल ना माझ वेगळ होत..कारण मी अशा व्यक्तिवर प्रेम केल होत जो मला माहित आहे माझा कधीच होऊ शकणार नव्हता तरीही मी प्रेम केल होत...! आता प्रेम तर झाल मग खुप वाटल कि सांगुन टाकाव..पण मग विचार आला माझ्या मनात कि, 'प्रेमात पडण सोप असत, पण ते निभवण खुप अवघड' पण मी तर already प्रेमात पडले होते त्याच्यात गुंतत चालले होते, अडकत चालले होते....!
मला अजुनही आठवते आमची पहिली भेट, समुद्र किनारा,संध्याकाळची वेळ, दोघांच्याही हातात coffee चा कप आणि माझ्या मनातील धुकधुक म्हणण्यापेक्षा धडधड त्याच्यापर्यंत पोहोचेल अशी शांतता आणि पहिल्या वहिल्या भेटीचा पहिला वहिला awkwardess आणि ते एकमेकांना बघन..हे सगळ घडत होत..हे सगळ घडत होत ते माझ्या....माझ्या....स्वप्नात...😍 म्हटला ना मी प्रेम केलय पण माझ थोड वेगळ आहे....! आता थोड real life मध्ये येऊन बोलुया. मी ज्याच्यावर प्रेम केल त्याला जोडणार एक साधन मला भेटल. वर्षभराखाली एक चिमणी पकडली होती पण तिचा इतका लळा लागला नसावा बहुदा म्हणुन सोडुन दिली होती. पण एकंदरीत जाणवल कि ती चिमणी पुन्हा पकडायला हवी. कारण जुन्या काळात जशी msg पोहोचवण्यासाठी कबुतर पाठवण्याची पद्धत होती तिच same पद्धत फक्त थोडी modified करून वापरली जात होता.
बघाना कस असत कि एखाद्या आपल्या भावना क्या चिमनीला सांगायच्या आणि तिला म्हणायच जा..बाई..टिवटिव..करत सांग त्या व्यक्तिला माझ्या भावना ती बरोबर त्या address वर जाते आणि तुमच्या भावना त्याला सांगते आणि मग सुदैवाने त्याच उत्तर मिळत तेही बरोबर तुमच्या address वर येत कारण user name जरी वेगवेगळे असले तरी @....address एकच असत ना... 😉☺😊
मीही खुप चिमण्या उडवल्या पण कोणतीही चिमणी उत्तर घेऊन माघारी आली नाही...अशी काहीशी माझी LoveStory चालु होती. पण भेटल म्हणुन सांगायची ती चिमणी... (Like..😉) त्यावेळेस मी पुन्हा एकदा त्याला भेटले पण यावेळेस आम्ही एका Hill Station वर होते आणि विशेष म्हणजे तो पहिल्या भेटीतला awkwardness नव्हता बर.... 😀 पण एक गोष्ट खुप मोठ्या प्रमाणात होती ते म्हणजे माझ्या डोळ्यात त्याच्यासाठी असलेल उत्कट प्रेम ते तो सहज पाहु शकत होता....! मग मी ठरवल कि आज भेटलाय तर विचारायच कि का नाही पाठवत उत्तर माझ?? आणि ठरल्याप्रमाणे मी त्याला विचारल...मग त्याने काय उत्तर दिल माहितीए...काहीच नाही...फक्त हसला..That was his Signature Smile...! आणि मी पुन्हा त्याच्या प्रेमात पडले आणि हे सगळ पुन्हा घडल... पुन्हा घडल माझ्या....स्वप्नात...😍 मग शेवटी तो दिवस उजाडला आणि नव्या उमेदिन पाठवल माझ्या चिमणीला आणि मला खात्री होती यावेळेस उत्तर नक्की येणार... आणि खरच तस झाल माझी चिमणी उत्तर घेऊन आली..क्या उत्तरीत लिहील होत कि तुझ्या चिमणी ची चिवचिव टिवटिव माझ्या चेहर्यावर नेहमी हास्य आणते म्हणजे माझ्या स्वप्नातच मला याच उत्तर मिळाल होत ती Signature Smile..😊 आता मात्र तुमची उत्सुकता खुप वाढली असेल ति नक्की ती व्यक्ती कोण ज्याच्या प्रेमात पडलेय मी आणि मी कोण आहे??? होना??? सांगते...सांगते... जस एकेकाळी राधाने क्रुष्णावर प्रेम केल होत त्याच क्रुष्णावर मीही प्रेम केल...आणि Believe मी अगदी राधा सारखर नितांत निखळ आणि पवित्र...! जस देव हा आपल्या भक्ताला विविध रुपात येऊन साक्षात्कार घडवत असतो तसाच माझाही क्रुष्ण विविध रुप घेऊन आज मला अतिशय गोड रूपात भेटला. तो अगोदर कला करून लोकांच्या आयुष्यात यायचा आज तो कलाकार म्हणुन माझ्या आयुष्यात आला आहे.
एव्हाना कळलच असेल मी कोणाबद्दल बोलतेय....हो तो म्हणजे तुमचा, माझा, आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता, सुपरस्टार, आणि माझा मितवा 'स्वप्निल जोशी' आणि मी त्याच्यावर राधासारखी प्रेम करणारी त्याची राधा त्याच्याच स्वप्नात राहणारी ........'स्वप्नसोनाली'.....😍😍

Khup sundar.. keep going 😊
ReplyDeleteThank you Mona
Deleteछान लिहिला आहेस. एकच सांगेन, लिहिणं कायम ठेव.. त्यात खंड पडु देऊ नकोस.. बाकी पुढच्या प्रवासाला शुभेच्छा 😃
ReplyDeleteधन्यवाद राहुल नक्कीच लिहीन....🙏
DeleteJab bhi likhna dil se likhna wada jaha araju hai waha gumhogye hum tere iss love story main warana pyar karna koi nhi janta
ReplyDeleteTere love story cute to hai bhut cute hai mast
Thank you dholya😘😘😘😘😘
DeleteKya baat!! Saadhya sopya goshti itkya kaushalyane lihilya ahes.. sahii.. bhannat..😘😘😘😘
ReplyDeleteAre bapre suku thank you ree
DeleteThanks a lot
😙😘😘😘😘