नाटक...का बघायच..?
नाटक- का बघायच...?
खरच, नाटक का बघायच बर...? हा प्रश्न मला नेहमी पडायचा. पण विचारायच कोणाला हा प्रतिप्रश्न म्हणुन मागे आहेच म्हणून कधी एवढा विचारच केला नाही. एकदा curiosity म्हणून Google वर सर्च केला..आपल्या generation ची सवय, काही नाही कळाल कि करा Google. पण याच उत्तर चक्क Googleकडे ही समाधानकारक नव्हत.
Googleच उत्तर-"नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती यांची भुमिका करणार्या नटांची रंगमंचावर सादर केलेली कलाकृती"
इतक typical उत्तर मी कधी पुस्तकात सुद्धा पुर्ण वाचल नव्हत...मग विचार केला स्वतः जाऊन बघुया कधीतरी कळल तर कळल नाहीतर विषय cut.
सध्या एक भूत आपल्या young generation च्या नसानसात भिनलय ते म्हणजे 'Selfie'च. काहीही असो Selfie तो must है ये बाबा. असच मलाही होत आणि अजुनही आहे तस म्हणा. पण त्या Selfie साठी का होईना मी पहिल्यांदाच एका नाट्यगृहात गेले.
नाटक होत...'दोन स्पेशल'...तेव्हा या नाटकाला बरेच पुरस्कार मिळाले होते आणि उत्सुकता ही होती म्हणून गेले बघायला आणि first half मध्येच मी clean bold झाले चक्क माझी तीनही दांडकी खटाखट उडाली...हाहाहा...हो खरच...मी havoc झाले.
त्याच कारण अस कि मी audience मध्ये बसले होते तिसरी घंटा झाली, पडदे उघडले, समोर तो set..खरा नसुनही खरा वाटेल असा..थोड्या वेळासाठी वाटल कि खरच एका printing press च्या office मध्ये आले आणि मग 'जितेंद्र जोशी' अशी bowling करत होते dialogueची कि प्रत्येक dialogue bouncerच जायचा. मला तिथे adjust होण्यात first half गेला. सगळं तस कळत होत पण सगळ खूपच नविन होत माझ्यासाठी अगदीच विलक्षण. No takes no retakes no cut...एकदा start ते direct break.
Break दरम्यान उत्सुकतेने भरभरून ओसंडून वाहत होते मी. तेवढ्यात माझ्या बाजूच्या दोन seat सोडून एक अगदीच वयस्कर 70-80 वयाचे आजी आजोबा बसलेले पाहिल्यावर मी न रहाऊन त्यांना विचारायला म्हणुन गेले आणि त्यांची परवानगी आणि वेळ घेऊन विचारल कि,
"आजोबा..या वयात तुम्ही नाटक बघायला आलात?? "
ते म्हणाले, "या वयात लोक एकतर देवदर्शनाला जातात किंवा नाटक बघायला"
मी विचारल,"पण तुम्ही नाटकच बघायला का आलात..?"
त्यांच उत्तर.."हे बघ बेटा, एखाद्या कलाकाराची खरी कला बघायची असेल ना तर ती फक्त नाटकातच बघायला मिळते..मला नाटकाची इतकी सवय झाली ना कि तिसरी घंटा वाजली कि मला तो पडदा सरकल्यावर....मला त्या दिग्गज कलाकारांचे भास होतात आणि या सध्याच्या कलाकारांचेही तेवढेच कौतुक वाटते ज्यांनी हा वारसा अजून जपलाय आणि जितेंद्र, भरत यासारखे कलाकार याला पुढे न्हेतात....!
उत्तर संपल आणि मी अगदीच हलले..!
मला सुचेनाच काय बोलाव.
मी मला त्यांच्या भावना समजल्याच सांगुन एक स्पेशल घ्यायला बाहेर आले...चहा...!
तिथेही एक जोडप गरम गरम चहाचा आस्वाद घेताना दिसल त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिले आणि असच कतरत्या आवाजात त्यांच्या पुर्वपरवानगीने त्यांनाही तोच प्रश्न विचारला
ते म्हणाले,"आवड आणि आमच प्रेम"
मी थोडी confuse झाले
आवड समजली पण प्रेम...कोणावर..?..मी विचारल.
"बाबा..प्रेम..?"
ते म्हणाले,"आमच्या दोघांच एकत्र एकमेव एकाच गोष्टीवर जुळत आणि एकाच गोष्टीवर आमच खूप प्रेम आहे ते म्हणजे 'नाटक'..आम्ही गेली 20 वर्षे झाली नाटक बघतो"
& it's out...माझी second wicket...काय विलक्षण प्रेम दिसत होत त्यांच्या डोळ्यात...बापरे..!
मी माझी batting सांभाळत कशीबशी second half बघायला गेले...मग नाटक संपल्यावर वाटल कि जाऊन सांगाव जितेंद्र जोशींना हे..पण तेवढा वेळ मिळाला नाही आणि गर्दी प्रचंड तेवढ्यात मला धक्का देऊन दोन मुली पुढे गेल्या आणि तिथेच थांबल्या त्याच gossip चालु होत.
"यार जितेंद्र जोशी कसला भारी ना...खरच एक selfie मिळावा यार...मी dp बदलणारच नाही परत...!"
मला उशिर होत होता तरीही 2 min तिथेच थांबले
"U know what...माझ ना...जितुकडून दुसरीकडे लक्षच गेल नाही...I just love him yaar."
मी म्हटल हे नाटकावर प्रेम म्हणायच की नाटककारावरच प्रेम😜😜
असो दोन्हीही चांगलच आहे,
मला उशीर झाल्याने मी लगेच निघाले
पण परत खूप विचार केला कि,"खरच...नाटक का बघायचे...?"
नाटक फक्त actor सोबत selfie काढण्यासाठी नव्हे तर नाटक बघावं ते कलाकाराने त्या कलाकृतीसाठी घेतलेल्या मेहनतीसाठी,कलाकारांच्या खर्याखुर्या प्रयत्नासाठी,एका जगावेगळ्या अनुभुतीसाठी,एक वेगळ जग अनुभवण्यासाठी,श्रीराम लागू नी 'नटसम्राट' या नाटकात समरस होऊन आपणहून बदललेल्या आशयानुरूप संवादासाठी,त्या प्रत्येक कलाकारासाठी जो फक्त नाटकासाठी जगतोय....त्रिवार सलाम आहे माझा या सर्व दिग्गज रंगकर्मींना..नाटककारांना....मानाचा मुजरा...🙏🙏🙏🙏
आता तरी नाटक बघणार ना नक्की..बघितल असेल तरी अजून एकदा आणि नसेल तर पहिल्यांदा नक्की बघा...'नाटक' नक्की बघा.
छान लिहलय सोनाली.असच लिहीत रहा.
ReplyDeleteThank you
Deleteहो नक्कीच लिहण्याचा प्रयत्न करत राहिल
🙏🙏
छान लिहलय सोनाली.असच लिहीत रहा.
ReplyDeleteस्वप्नसोनाली अभ्यासपूर्ण ब्लॉग लिहीलाय. खूपचछान.तुझी लेखणी अशीच तळपत राहू दे.
ReplyDeleteनक्कीच गौतम जी...धन्यवाद 🙏
Deleteखूप सुंदर,असेच सुरेख सुरेख लिहीत जा सोनाली....
ReplyDeleteनमस्कार सोनाली ताई,
ReplyDeleteछान लिहिता तुम्ही. तुमचा "नाटक...का बघायच.." हा आणि इतर लेख वाचले.
तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल मला. मी डॉक्टर स्पर्शिका जोशी. मी मुंबई ला असते.
मला तुम्ही hangout वर sparshika@gmail.com इथे संपर्क करू शकता. म्हणजे आपण बोलू.
धन्यवाद ,
डॉक्टर स्पर्शिका जोशी.
स्त्री रोग तज्ज्ञ
M.D. D.G.O.
मुंबई